महिलांसाठी एसटी बसच्या प्रवासात आजपासून ५० टक्के सवलत मिळणार आहे. पण सर्वच प्रवासासाठी नाही!Mahila St Pravas GR mahiti
महाराष्ट्र बस तिकीट सवलत तुम्ही ऐकली असेल. महिलांसाठी आनंदाची बातमी! एसटी बसच्या प्रवासात आजपासून ५० टक्के सवलत मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने आपल्या बजेटमध्ये महिलांसाठी एसटी बस प्रवासावर ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. आता याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. उद्यापासून नियमित ह्या नव्या कोऱ्या योजनेचे त्याचे फायदे मिळण्यास सुरुवात होईल.
महाराष्ट्र बस तिकीट सवलत ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी बसच्या प्रवासात आजपासून ५० टक्के सवलत मिळणार आहे.
महाराष्ट्रातील महिलांना एसटी बसमधून प्रवास करताना मिळणार 50 टक्के सवलत ! पण सर्वच प्रवासासाठी नाही.
महिलांसाठी महाराष्ट्र एसटी बस तिकीट स्वस्त झालं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात (महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-2024) अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीने (एसटी बस फेअर) प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिटाच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली.
आणि बोलल्या प्रमाणे आपली वचनपूर्ती करत लगेचच ह्या आदेशाचा जीआर जारी करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजे १७ मार्च पासून एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. एसटी महामंडळाची ही योजना महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे.
महिलांचा सन्मान – एसटी प्रवासावर ५०% सूट
आजपासून महाराष्ट्रातील महिलांना राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सूट मिळणार आहे. ही घोषणा 2023-24 च्या राज्याच्या अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून करण्यात आली होती आणि ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) स्तरावर नव्याने सादर करण्यात आलेल्या “महिला सन्मान योजना” योजनेद्वारे लागू केली जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती शासनाकडून महामंडळाला दिली जाणार आहे.
मुंबई / पालघर/ रायगड (पेण)/रत्नागिरी/सिंधुदूर्ग/ठाणे/नाशिक/धुळे/जळगांव/अहमदनगर/पुणे/कोल्हापूर/ सांगली/सातारा/सोलापूर/छत्रपती संभाजीनगर/बीड/जालना/लातूर/नांदेड/धाराशिव / परभणी/नागपूर/भंडारा/चंद्रपूर/ वर्धा/गडचिरोली/अकोला अमरावती/यवतमाळ /बुलडाणा ह्या सर्व विभागातील एस टी महामंडळाला जीआर काढून आदेश देण्यात आले आहेत.
ह्या जीआर नुसार सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या त्यामध्ये साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई ( साधी व वातानुकुलीत) इतर इत्यादी बसेसमध्ये ५० % सवलत दि. १७ तारखे पासून लागू करण्यात येत आहे.
सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील.
सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे. | सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत लागू केली आहे.
सदर सवलत शहरी वाहतूकीला लागू झालेली नाही.
ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
सवलत लागू केलेल्या दिनांक पूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात यावा.
सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.
मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही केली जाईल. महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या एसटी महामंडळ आधीच समाजातील विविध घटकांना तिकीट दरात ३३ टक्के ते १०० टक्के सवलत देत आहे. स्वातंत्र्य सोहळ्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सरकारने यापूर्वी 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सवलत आणि 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये 50 टक्के सवलत जाहीर केली होती. या सवलतींसाठी शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कमही महामंडळाला मिळते.
तर सरकारच्या ह्या पावलाचा महिलांना नक्कीच फायदा होणार आहे. कामावर जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी दररोज सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या महिलांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महीला अनेकदा प्रवासासाठी एसटी बसचा वापर करतात. त्यांच्याकडे पुरेसे पैसै कुठे जाण्यासाठी नसतात.
ह्या नव्या सवलतीमुळे महिलांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल आणि महीला सक्षम बनतील.