मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Ladaki-Bahin-Yojana-2024 |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Ladaki-Bahin-Yojana-2024 |

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ची घोषणा १ जुलै २०२४ रोजी पासून सुरू केली गेली आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेची प्रथम घोषणा ही मध्यप्रदेश सरकारने केली होती त्यांची योजना ही “लाडली बहना” अशी होती आणि ती योजना प्रचंड लोकप्रिय झाली. याच धर्तीवर आता महाराष्ट्रात ही योजना लागू होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. या योजनेमध्ये महिलासाठी काय लाभ आहेत? कोणत्या महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. याची माहीती आपण या लेखात घेऊ.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील महिला या योजनेसाठी पात्र असतील आणि ज्यांची निवड या योजनेत होईल त्या महिलाना महिना १५०० रूपए त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. आता आपण या योजनेची पात्रता आणि अपात्रता जाणून घेऊ.
या योजनेत कोणत्या महिला पात्र आहेत त्याची माहिती घेऊ:-
१. अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे.
२. अर्जदार महिला ही परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटीत, विवाहीत किंवा निराधार असेल तर ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.
३. अर्जदार महिलेचे वय हे २१ वर्षे पूर्ण असले पाहिजे, म्हणजेच वय वर्षे १८ ते ६० वर्षे वयापर्यंत असलेल्या महिला या योजनेस पात्र आहेत.
४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला अर्ज करणार त्यांचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे आणि ते बँक खाते आधार आणि पण कार्डशी सलग्न असले पाहिजे.

👉🏻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

५. ज्या अर्जदार महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे घरातील एकूण वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.
६. अर्जदार महिलेने या आधी राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कोणत्याही योजनेद्वारे दीड हजार पेक्षा अधिक रक्कमेचा लाभ घेतलेला असेल तर ती महिल आया योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
७. अर्जदार महिला जर करप्राप्त असतील तर त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील.
८. ज्या महिलांच्या कुटुंबातील कुणी सरकारी नोकर असेल तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
९. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य जर सरकारी निवृत्ती वेतन धारक असतील तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
१०. ज्या महिलांच्या कुटुंबात ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ती महिला या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
११. कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. (पण याला अपवाद असा आहे की जर चारचाकी शेतीसाठी असेला ट्रॅक्टर असेल तर तो चालू शकतो.)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

१. अर्जदार महिलेकडे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला असला पाहिजे.
२. अर्जदार महिलेकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे.
३. अर्जदार महिलेकडे आधार कार्ड, रेशनकार्ड असले पाहिजे.
४. स्वतःच्या नावावर बँक खाते आणि ते बँक खाते आधार कार्डशी सलग्न असले पाहिजे.
५. एक पासपोर्ट साइज फोटो पाहिजे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधी, कुठे आणि कसा अर्ज कराल?

१. या अर्जाची मुदत ही १ जुलै २०२४ पासून १५ जुलै २०२४ पर्यन्त आहे.
२. हा अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पोर्टल वर, मोबाईल आप वर सुद्धा करू शकता.
३. ज्यांना हा अर्ज करता येत नाही ते अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात.
४. अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल.
५. अर्जदार महिलेने अर्ज भरताना तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे. जेणेकरून तिथे तिचा थेट फोटो काढला जाईल.

 

👉🏻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *