शेतकरी पाईपलाईन अनुदान योजना |Agriculture Pipeline scheme |

शेतकरी पाईपलाईन अनुदान योजना |Agriculture Pipeline scheme |

 

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती या व्यवसायामुळे सांभाळली जाते आणि त्याच शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. कारण शेतकरी बळकट असेल तर जनता बळकट होईल आणि जनता बळकट झाल्यानंतर देश बळकट होईल.

Farmer

सध्याच्या घडीला भारत हा आपला देश कृषि क्षेत्रात प्रचंड प्रगती करत असल्याचा आपल्याला पहायला मिळतो आहे. अलीकडील काही काळात आपण बाहेरील देशांना जो पुरवठा शेतीउत्पनातून करतो त्याच्यातला टक्का बऱ्याच प्रमाणात वाढला असून हे भारतीय शेतीसाठी निश्चितरूपात महत्वाचे ठरत असलेले गणित म्हणावे लागेल. आणि परदेशातून वाढती मागणी व निर्यात केल्या जाणाऱ्या मालाची एकूण सविस्तर माहिती घेता आपल्याला शेतीला अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच केंद्र सरकार सध्या विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकऱ्यांना अधिक बळकट करायला विविध योजनांना समोर घेऊन येत असताना पहायला मिळतं आहे. शासनाने नुकतचं शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना आणल्या त्यामधे एक खास योजना होती जी आजच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या लाभाची ठरणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदीवर आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. शेती करत असताना शेतमालाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणं ही बाब अत्यंत गरजेची आहे, त्यावरचं आपल्या पिकाचा दर्जा ठरतो. शासनाने शेतीच्या पाणी पुरवठ्याच्या अडचणींकडे लक्ष केंद्रित करत आता पाणी पुरवठा करण्याकरता शेतकऱ्यांना लागणाऱ्या पाईपलाईन्सचा जो काही खर्च येतो तो फार मोठा असल्याने अनेक शेतकरी बऱ्याचदा टाळाटाळ करतात, ही बाब जाणून घेत पाईपलाईनच्या खरेदीवर आता तुम्हाला शासन आर्थिक सहाय्य करणार आहे.

 

Indian Farmer

1) या योजनेतून कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे?

 

▪️ज्यांच्या शेतीमधे डिझेल अथवा इलेक्ट्रिक इंजिनने चालणाऱ्या मोटरी उपलब्ध आहेत अशांकरता ही योजना दिली जाईल.

 

▪️शेतकऱ्यांकडे किमान 2 एकर जमिनीचे क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.

 

▪️या योजनेच्या लाभासाठी एखाद्या शेतकऱ्याने जलसिंचन योजनेतील वा इतर योजनेतील लाभ हा किमान दहावर्षे तरी घेतलेला नसावा.

 

▪️अनुदानाची रक्कम मंजुर करून घेण्यासाठी पाईपलाईन खरेदीच्या एक महिन्याच्या आतच तुम्हाला निवेदन द्यावे लागेल अन्यथा तुमचा अर्ज बाद ठरवला जाऊ शकतो.

 

▪️सामायिक शेतीकरता देखील पाईपलाईनसाठीच्या अनुदानाकरता अर्ज करता येईल.

 

2) खाली दिलेल्या आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल:-

 

पासपोर्ट साईज फोटो.

आधार कार्ड.

आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे.

बँक पासबुकची प्रत.

रहिवासी प्रमाणपत्र.

मोबाईल नंबर.

पाईपलाईन खरेदीचे बिल.

जमिनीचा सातबारा.

 

3) पाईपलाईन सरकारी अनुदान योजनेच्या लाभासाठी अर्ज कुठे करायचा?:-

 

▪️तुम्ही जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन त्यांच्याकडे योजनेचे नाव सांगून फॉर्म भरू शकता.

 

▪️आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज व त्याची प्रक्रिया माहिती सहज उपलब्ध आहे.

 

▪️तुम्ही आपल्या जवळच्या भागातील कृषी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधू शकता.

 

4) शासनाची ही योजना राबवण्याची मुख्य उद्दीष्टे:-

 

▪️जमिनीची धुप अलीकडे वाढली आहे, तिची सुपिकता टिकवण्याकरता मुबलक पाणी प्रमाणाची तितकीच गरज निर्माण झाली आहे, यातून पिकाचा दर्जा टिकून रहावा हा हेतू आहे.

 

▪️भारतात कोरडवाहू शेतीचं प्रमाण फार आहे. या प्रमाणामुळे अनेकदा शेतकरी काही पिकांची लागवड करून उत्पन्न घेऊ शकत नाही तर ही शेतकऱ्यांची हतबलता हटविणे गरजेचे आहे, हे सरकारने डोळ्यांसमोर उद्दिष्ट ठेवल्याचे पहायला मिळते.

 

▪️हवामान बदलाने शेतीवर फारसा परिणाम होतो, त्यामुळे हवामान बदलतील निष्कर्ष जाणून पाणी पुरवठ्याची तशी तजवीज करण्यात यावी, ही बाब महत्वाची ठरते.

 

5) योजनेतून मिळणारी आर्थिक अनुदान सहाय्याची रक्कम:-

 

या योजनेतून पाईपलाईन खरेदीसाठी झालेल्या एकुण रकमेच्या ५०% रक्कम ही शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येईल. अथवा १५००० रूपये रोख एकदाच तुमच्या बँक अकाउंटवर जमादेखील केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *