हर घर तिरंगा महोत्सव 15 ऑगस्ट | Har Ghar Tiranga Mahotsav 15 August |

 हर घर तिरंगा महोत्सव 15 ऑगस्ट | Har Ghar Tiranga Mahotsav 15 August |

 

 

मेरी शान तिरंगा, मेरी जान तिरंगा

हर घर तिरंगा, हर गांव तिरंगा

.

.

 

हा स्वातंत्र्य दिन सगळ्यांसाठी खूप खूप अविस्मरणीय असणार आहे. हो नक्कीच.. कारणही तसेच आहे.. कारण यावेळी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होवून ७५ वर्षे पुर्ण झाली आहेत. या स्वातंत्र्यामागचा इतिहास तर आपल्याला माहीत आहेच.. अनेक थोर नेत्यांच्या आहुतीमुळे, संघर्षामुळे आणि त्यागामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले, त्यामुळे त्यांच्या प्राणाची आहुती ही तितकीच महत्वपूर्ण मानली जाते. कारण या सगळयामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. मग त्या सगळया थोर व्यक्तींना विसरून कसं चालेल, ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. ही ७५ वर्षे आता आपण त्यांच्यामुळेच साजरी करत आहोत याचे भान ठेवून त्याची आठवण ही गरजेची आहे. 

जर या स्वातंत्र्यदिनाला आपण प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्हयात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात  जवानांच्या हस्ते ध्वजारोहण केले.. तर भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येकाला एक वेगळी आदरांजली आपण समर्पित केली असे म्हणू.. प्रत्येक ठिकाणी  नेते किंवा राजकीय मंडळी यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यापेक्षा ज्यांना खरेच या स्वातंत्र्याचे महत्व आहे.. त्यांच्या हस्ते केले तर एक वेगळा पायंडा पडणार नाही का? पण हा विचार प्रत्येकाच्या मनात येवून फक्त जातो.. अपवाद वगळता काही ठिकाणी त्याचा अवलंबन केले जाते.

 

हर घर तिरंगा म्हणजे नेमके काय?

 

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित उत्सव हा १३ ते १४ मे रोजी साजरा होणार असला तरी हर घर तिरंगा  २ ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी चालू आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींजीनी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवामध्ये सर्व भारतीयांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

 

हर घर तिरंगा मोहिमेचा हाच हेतू आहे की ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर योग्य ते नियम पाळून झेंडा फडकवायचा आहे. तसेच आपल्या राष्ट्रीय झेंड्याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी हा या मोहीमेमागचा उद्देश आहे. 

तसेच यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी एक वेबसाईट देखील बनवण्यात आली..असून लहान मुले देखील यामध्ये सहभागी होवू शकतात. 

 

त्यामुळे लहान मुलांना देखील आपल्या झेंड्याविषयी अधिकाधिक माहिती मिळेल आणि देशप्रेम त्यांच्या मनातही जागृत होईल.. एकंदरीत हा सण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे आणि या ७५ वा स्वातंत्र्यदिनाची नक्कीच इतिहासात कुठे तरी नोंद होईल आणि यासाठी प्रत्येक भारतीयाचे आपण भारतीय असल्याचे कर्तव्य बजावले पाहिजे.

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि आपण

सगळ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर अफवांना बळी न पाडता आणि कुणाच्याही बोलण्याला न भुलता आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण या देशाचं काही तरी देणं लागतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.. आणि हर घर तिरंगा ही मोहीम फत्ते केली पाहिजे.. का आपण कोण तर बोलेल, कोण तर करेल, मग आपण करू म्हणून वाट बघत बसायचे.. आपण आधी सुरुवात करू शकत नाही का?  

 

गेली चार दिवस एक मॅसेज फिरत आहे.. सर याच्याकडे झेंडा आहे पण घर नाही .. याला घर हवं आहे.. अरे या सगळया पलीकडे आपल्या राष्ट्रीयझेंड्याची महती आहे.. घर नाही ना तर डोक्यावर लाव झेंडा कारण तो झेंडा तूझ्या डोक्यावर लावण्या इतका तु आता स्वातंत्र्य आहेस.. रडून, तक्रार करून कोणी आपल्या मदतील येणारं नाही.. जेव्हा हुकूमशाही मोडून काढून लोकशाही आपण आचरणात आणू तेंव्हा आपल्याला कुणाकडं गयावया करण्याची गरज राहणार नाही.. का प्रत्येक वेळी आपल्या हक्काच्या प्रत्येक गोष्टीसाठी या राजकारण्याचे पाय धरा.. आणि त्याचे पाय धरायची ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे.. असो या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आपण दाखवून देवू की आम्ही सुद्धा या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत..

 

भले ही प्रत्येक गाव, शहर आणि राज्य यांची रिती – परंपरा, भाषा  वेगळया आहेत..पण आपल्या सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम ही भावना समान आहे.. आपल्या राष्ट्रीय ध्वजासाठी आपण नेहमी एकत्र येवू आणि याच राष्ट्रभक्तीसाठी आपण स्वातंत्र्य भारताचा  अमृत महोत्सव भव्य दिव्य नक्की बनवू आणि हर घर तिरंगा  या मोहिमेप्रमाणे देशातल्या प्रत्येक घरात आपला तिरंगा फडकवू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *