जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय? जीबी व्हॉट्स ॲप वापरण्याचे धोके कोणते आहेत? GB WhatsApp froad information in Marathi

जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय? जीबी व्हॉट्स ॲप वापरण्याचे धोके कोणते आहेत? GB WhatsApp froad information in Marathi

जीबी व्हॉट्सॲपच्या ॲड ऑन फीचर्समुळे यूजर्सला व्हॉट्सॲप वापरायला सोपं जातं आणि मजा येते.
पण जीबी व्हॉट्सॲपचे फिचर्स जितके आकर्षक आहेत तितकेच ते अधिक धोकादायक ठरू शकतात का? हो नक्कीच मित्रांनो, तुमच्या ह्याच प्रश्नांचं उत्तर ह्या लेखातून आम्ही देणार आहोत.

मित्रांनो, Whatsapp ह्या सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲपचे भारतात 340 दशलक्षाहून अधिक ॲक्टीव यूजर्स आहेत. मेसेजिंग व्यतिरिक्त, ह्या फ्री मेसेजिंग ॲपमध्ये व्हिडिओ कॉलिंग, व्हॉइस कॉलिंग, स्टेटस आणि इतर अनेक फीचर्स तुम्हाला मिळतात. मग जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय?

जीबी व्हॉट्सॲप/ GB what’s app म्हणजे काय?

हे व्हॉट्सॲपच्या सुधारित आवृत्त्यांपैकी एक आहे जे लोकमूळ व्हॉट्स ॲप चे फिचर्स हॅक करून त्यांचा चॅटिंग अनुभव मजेदार बनवण्यासाठी वापरतात. हे थर्ड पार्टी ॲप म्हणजे क्लोन ॲप आहे.
व्हॉट्सॲपच्या मॉड apk समोर अनेक व्हॉट्सॲप यूजर्सना त्याची फीचर्स फारच कमी दिसतात, ज्यामुळे ते व्हॉट्सॲपची थर्ड पार्टी किंवा मॉडिफाइड व्हर्जन वापरतात जिथे ते त्यांच्या स्वतःच्या सेटिंग्ज जसे की जीबी व्हॉट्सॲप प्रो, ओजी व्हॉट्सॲप, व्हॉट्सॲप प्लस इ. वापरु शकतात.

ह्यात वेगळं काय असतं तर काही फिचर्स आपल्याला रोजच्या व्हॉट्स अप मध्ये मिळत नाहीत ती ह्यात असतात. जीबी व्हॉट्सॲप किंवा प्रो सारख्या इतर थर्ड पार्टी व्हॉट्सॲप ॲप्समध्ये थीम बदलण्यापासून, इतर अनेक उत्कृष्ट फीचर्स प्रदान केली जातात.

मात्र, व्हॉट्सॲपच हे व्हर्जन वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याचे फायदे, तोटे आणि डाऊनलोडिंगबद्दलही आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

जीबी व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला हे फीचर्स मिळतील

थीम बदला आवडीची: येथे उपलब्ध असलेल्या विविध थीममधून तुमची आवडती थीम निवडा.

नेहमी ऑनलाइन दिसा: WhatsApp बंद केल्यानंतरही स्वत:ला ऑनलाइन दाखवा.

लास्ट सीन लपवा: संपर्क सूचीमधून विशिष्ट संपर्कासाठी शेवटचे पाहिले देखील लपवले जाऊ शकते.

स्टेटस सेव्ह करा: व्हॉट्सॲपवर इतर लोकांनी अपलोड केलेले व्हॉट्सॲप स्टेटस कॉपी करा किंवा फोनवर डाउनलोड करा.

टायपिंग करतानाचा स्टेटस लपवा: टायपिंग किंवा रेकॉर्डिंग करताना दिसणारी टायपिंग… किंवा रेकॉर्डिंग… स्टेटस बंद करा.

सर्वोत्कृष्ट इमेज क्वालिटी: WhatsApp वर पाठवलेले फोटो अनेकदा कमप्र्स केले जातात आणि पाठवल्यावर कमी दर्जाचे बनतात. पण जीबी व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्ही हाय क्वालिटीचे फोटो पाठवू शकता.

प्रोफाइल चेंज नोटीफिकेशन: जेव्हा कोणी तुमच्या काँटॅक्ट लिस्टमधून त्याचा प्रोफाइल फोटो किंवा डीपी बदलतो तेव्हा तुम्हाला नोटीफिकेशन मिळतं.

ऑनलाइन स्टेटस: चॅट न उघडता फक्त चॅट लिस्टवर ऑनलाइन स्टेटस पहा.

चॅटिंगसाठी वापरा आवडीचा फॉन्ट: उपलब्ध फॉन्टमधून तुमच्या आवडीची कोणतीही फॉन्ट स्टायल निवडा.

जास्तीत जास्त फोटो पाठवा: एकाच वेळी 90 पेक्षा जास्त फोटो पाठवा आणि 50 MB पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप आणि 100 MB पेक्षा जास्त ऑडिओ क्लिप पाठवू शकता. त्याच वेळी, अधिकृत Whatsapp मध्ये ही मर्यादा खूपच कमी आहे.

DND: इंटरनेट सुरू झाल्यानंतरही, तुमचे मेसेज Whatsapp वर येणार नाहीत किंवा जाणार नाहीत.

ऑटो रिप्लाय: येथे तुम्ही ऑटो रिप्लाय मेसेज सेट करू शकता, तुम्हाला मेसेज पाठवताच तो तुमच्या वतीने आपोआप रिप्लाय करेल.

मेसेज डिलिव्हरी रिपोर्ट: मेसेज पाठवल्यानंतर, डिलिव्हर झाल्यावर डबल टिक आणि वाचल्यानंतर ब्लू टिक देखील बंद केली जाऊ शकते.

मेसेज शेड्युलिंग: कोणाला कधी मेसेज पाठवायचा हे देखील सेट केले जाऊ शकते.

ब्रॉडकास्टिंग: 250 लोकांऐवजी 600 लोकांना प्रसारण संदेश पाठविण्याची क्षमता मिळते.

कॉलिंग बंद करा: कोणत्याही संपर्कासाठी कॉलिंग बंद करण्याची सुविधा आहे.

ह्या व्यतिरिक्त, GBWA मध्ये अनेक Add on Features किंवा Hacks देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे लोक ते वापरतात, परंतु तुम्हाला त्याचे काही तोटे देखील माहित असले पाहिजे जे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

जीबी व्हॉट्स ॲप सुरक्षित आहे का? त्याचे तोटे काय आहेत?

जीबी व्हॉट्स ॲप एक थर्ड पार्टी ॲप आहे, त्यामुळे WhatsApp च्या मूळ कोडमध्ये छेडछाड केली गेली आहे आणि त्याच्या परवानग्या देखील बदलल्या गेल्या असतील ज्याचा वापर आपल्या स्मार्टफोनमधील महत्वाची माहिती चोरण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो.

व्हॉट्सॲपला काही चुकीचं दिसलं तर तुमचं मूळ WhatsApp अकाऊंट देखील ब्लॉक केलं जाऊ शकतं. तसही आता हे मॉड APK आता अँटी-बॅन फिचर्ससह आलं आहे.

जीबी व्हॉट्स ॲप डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी वेबसाइट वापरावी लागेल. ते तुम्ही Google Play Store वरून अपडेट किंवा डाउनलोड करू शकत नाही.

अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की, ह्या व्हॉट्स ॲप द्वारे पाठवलेले मेसेज एंड टू एंड एन्क्रिप्शन नाहीत. कदाचित हा मेसेज थर्ड पार्टी सर्व्हरवरून जात असेल जो कोणीही तिसरा वाचू शकतो म्हणजेच तुमचा मेसेज अजिबात सुरक्षित नाही.

GBWhatsapp च्या कमकुवत सर्व्हरमुळे, मालवेअर आणि स्पायवेअर सारखे धोकादायक व्हायरस येथून तुमच्या डेटाला हानी पोहोचवू शकतात.

याचा अर्थ तुमच्या व्हॉट्सॲप अकाऊंटशी संबंधित सर्व डिटेल्स ॲक्सेस करता येतात. हा तुमचा चॅट हिस्ट्री. फोटो आणि व्हिडिओ असू शकतो. परंतु अधिकृत WhatsApp मध्ये, तुमच्या चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात, याचा अर्थ फक्त तुम्ही आणि तुमचे संपर्क मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ दाखवू शकता.
तसंच जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जीबी व्हॉट्स ॲप इंस्टॉल करता तेव्हा ते काही परवानगी मागते आणि तुम्ही त्यांना परवानगी देता सुद्धा. पण बॅकग्राउंडमध्ये ते तुमचा डेटा चोरू शकतात हे तुम्हाला माहीत नसतं.

जीबी व्हॉट्स ॲप कसं डाउनलोड करायचं? (Android APK फाइल)
जीबी व्हॉट्सॲप हे एक मॉड ॲप्लिकेशन आहे आणि ते गुगल प्ले स्टोअरच्या धोरणाविरुद्ध आहे त्यामुळे ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. जीबी व्हॉट्स ॲप डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला GMod सारखी थर्ड पार्टी वेबसाइट वापरावी लागेल.

तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये सिक्युरिटीमध्ये जा. येथे अज्ञात स्त्रोत पर्याय सक्षम करा.
विडमेट ॲप इन्स्टॉल करत आहे
आता इंटरनेटवरून जीबी व्हॉट्स ॲप डाउनलोड करा.
जीबी व्हॉट्स ॲप इन्स्टॉल करा
एकदा इन्स्टॉल झाल्यावर तुमच्या नंबरने लॉग इन करा.
यासाठी, OTP सह तुमचा नंबर व्हेरिफाय करा आणि त्यानुसार कस्टमाइज करून GBWA वापरायला सुरू करा.

जीबी व्हॉट्स ॲप अपडेट कसं करायचं?

तुमच्या स्मार्टफोनवर जीबी व्हॉट्स ॲप उघडा, येथे तीन लाइन्स किंवा 3 डॉट्सवर क्लिक करा.
जीबी सेटिंग्ज पर्यायावर जा.
GBWhatsapp अपडेट करा
आता Updates मधील Check for Update या पर्यायावर क्लिक करा आणि GBWA अपडेट करा

अपडेटसाठी उपलब्ध नवीन व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.

मित्रांनो, जीबी व्हॉट्स ॲप चा मालक कोण आहे? हे कोणी बनवलं माहीत आहे का?

GBWhatsApp चा डेव्हलपर कोण आहे? जीबी व्हॉट्सॲप कोणी तयार केले हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. GBWhatsApp चा निर्माता दारा (सीरिया) येथील अँड्रॉइड प्रोग्रामर आणि डेव्हलपर ओमर असल्याचे मानले जाते कारण त्याने त्याच्या ट्विटर अकाउंट वर दावा केला आहे.

तर त्याच वेळी काही लोकांचा असा विश्वास आहे की व्हॉट्सॲपची ही मोड व्हर्जन वरिष्ठ XDA सदस्य ‘Has.007’ ने बनवली आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की मूळ व्हॉट्सॲप ब्रायन ॲक्टन आणि जॅन कोम यांनी 2009 मध्ये तयार केले होते, जे आता मार्क झुकरबर्गच्या मालकीचं आहे.

अशा प्रकारे तुम्ही जीबीडब्ल्यूए डाउनलोड आणि अपडेट करू शकता, परंतु त्याच्या फीचर्ससह, तुम्ही यामुळे होणारे नुकसान देखील लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेला खूप नुकसान होऊ शकतं. एकदा तुमच्या फोनवर इंस्टॉल केल्यानंतर ते तुमच्या डेटामध्ये प्रवेश करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *