गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे | Google pay gate loan check |

गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे | Google pay gate loan check |

 

 गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे?

तुम्हाला गुगल पे तर माहित असेलच. याचा उपयोग आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो  पण तुम्हाला हे माहीत आहे का?  आता तुम्ही गुगल पे द्वारे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.  आश्चर्य वाटले असेल ना …. असे पर्याय आता अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर आहेत. 

कधीतरी  आपल्याला अचानक पैशांची गरज भासते आणि तुम्हाला बँकेकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. ते आपण घेतो ही पण तो पैसा आपल्या बँकेत जमा होतो आणि तो आपल्याला काढण्यासाठी बँकेच्या दारी  खेटा घालाव्या लागतात किंवा आपल्याला चेक दिला जातो तो वठवण्यासाठी तरी बँकेत जावे लागते. पण आता तर एक नवीन पर्याय आहे जो आपल्यासाठी वरील पैकी काहीही न करता  तयार झाला आहे. ज्याद्वारे तुम्ही लोकांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्वरित मिळवू शकता. 

गुगल चा उद्देश जगाची माहिती आपल्या पर्यन्त व्यवस्थित पोहोचविणे  आणि ती प्रत्येकासाठी योग्यरीत्या उपयुक्त बनवणे हा आहे. शोध, नकाशे, जीमेल, अण्ड्रोइड, गुगल पे, क्रोम आणि यू ट्युब सारखी उत्पादने आणि प्लॅटफॉर्म असलेल्या अब्जावधी लोकांच्या दैनंदिन जीवनात गुगल हे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि ती जगातील सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक बनली आहे. हे तर आपण जाणताच. 

गुगल पे अॅपद्वारे पारदर्शक आणि सहज क्रेडिट :-

भारतातील गुगल पे चे ग्राहक आता पेमेंट सेवेच्या अॅपद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि ते कर्ज मिळवू शकतात. गुगल पे ने गुगल पे वापरकर्त्यांना “पारदर्शक आणि सहज क्रेडिट” प्रदान करण्याच्या उद्देशाने डिएमआय  फायनान्स या भारतीय डिजिटल फायनान्स कंपनीच्या सहकार्याने कर्ज सेवा सुरू केली आहे. डिएमआय  फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ने गुगल पे वापरकर्त्यांना सुरक्षित क्रेडिट प्रदान करण्यासाठी गुगल पे वर वैयक्तिक कर्ज उत्पादन प्रदान  करण्याची घोषणा केली. हे उत्पादन गुगल पेच्या ग्राहकांना  फायदेशीर असणार आहे. डिएम आय  आपल्या ग्राहकांना  डिजिटल कर्ज वितरण करण्याबरोबरच आपले ग्राहक अशा पद्धतीने वाढवत आहे.  जेणेकरून नवीन-क्रेडिट वापर करणार्‍यांना त्या पटीत आपल्याकडे  खेचण्यास मदत होईल. 

डिजिटल फायनान्स उपक्रम :-

डीएमआय हे डिजिटल ग्राहक आणि एमएसएमई कर्ज, गृह वित्त, घाऊक वित्त आणि मालमत्ता व्यवस्थापन यामधील प्रमुख व्यवसायांसह संपूर्ण भारतातील क्रेडिट प्लॅटफॉर्म आहे. याची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली होती आणि भारतातील ४० ठिकाणी पसरलेल्या अत्यंत अनुभवी टीमद्वारे समर्थित आहे. ही एक टेक-फर्स्ट बँक आहे ज्यामध्ये उद्योग-अग्रणी डिजिटल फायनान्स उपक्रम आहेत. जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार, धोरणात्मक कौटुंबिक कार्यालये, महत्त्वाच्या बँका आणि भारतातील सार्वजनिक बाजार कर्जदार या सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आहे.  

———————

हे पण वाचा

 

आता एक मिनिटांमध्ये एचडीएफसी बँक पर्सनल लोन मिळवा त्यासाठी येथे क्लिक करा

——————

ही योजना प्रत्येकी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्रदान करेल, जास्तीत जास्त ३६  महिन्यांत परतफेड करता येईल. हे सहयोग १५,००० हून अधिक पिन कोडमध्ये सादर केले जाईल. कंपनीने परिभाषित केलेल्या निकषांवर आधारित डीएमआय फायनान्शियल पात्र वापरकर्त्यांना पूर्व-पात्र बनवते आणि आपल्या उत्पादनाची  मागणी  त्यांना गुगल पे द्वारे उपलब्ध करून दिली जाते. या वापरकर्त्यांच्या अर्जांवर जवळपास रिअल-टाइममध्ये प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.  आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यांमधील निधीमध्ये त्वरित प्रवेश घेता येईल. गुगल पे वरून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला या सर्व अॅप्सच्या मूळ कंपनीकडून कर्ज घ्यावे लागेल. यासोबतच ग्राहकाचा सिबिल स्कोर ७०० च्या वर असावा आणि त्यासोबत तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील असायला हवे.

डिजिटल फायनान्स इकोसिस्टममधील प्रमुख सहभागींच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण डिजिटल आर्थिक उत्पादने विकसित करण्याची  डीएमआय ची वचनबद्धता गुगल पे चा वापर करणार्‍यांसाठी एकात्मिक वैयक्तिक कर्ज प्रवास सुरू करून सुरू केलेली आहे. 

डिएमआय  फायनान्स लिमिटेडचे सहकार्य  :-

गुगल पे ने डिएमआय  फायनान्स लिमिटेड (DMI) सोबत हातमिळवणी करून पर्सनल लोनची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही एक अतिशय सोपी आणि झटपट (डिजिटल पर्सनल लोन) कर्ज मिळवून देणारी सुविधा आहे. गुगल पे आणि डिएमआय  फायनान्स लिमिटेड कडून ग्राहक सहजपणे या झटपट कर्ज मिळविण्याचा लाभ घेऊ शकतात

 गुगल पे या सुविधेचा फायदा घेणार्‍यांचा थोडक्यात निकष :-

सर्वच गुगल पे वापरकर्त्यांना या पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेता येणार नाही. तुमची क्रेडिट इतिहास चांगली असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. क्रेडिट इतिहास म्हणजे तुम्ही तुमचे कर्ज परत करण्यासाठी पात्र आहात का? या आधी घेतलेले कर्ज तुम्ही वेळेवर फेडले आहे का? त्याची परत फेड करताना तुम्ही किती हप्त्यामध्ये केली आहे.  याची शहानिशा केली जाते यालाच क्रेडिट इतिहास आणि क्रेडिट स्कोअर म्हटले जाते. याबरोबरच  तुमच्या उर्वरित कागदपत्रांनुसार तुम्हाला गुगल पे द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाते. जर तुम्ही याचे प्री-अप्रूव्ह ग्राहक असाल, तर तुम्हाला लवकरच कर्जाची  प्रक्रिया केल्यानंतर त्वरित कर्ज दिले जाते व त्यानुसार तुम्हाला कर्ज द्यावयाचे की नाही हे ठरविले जाते. आजपर्यंत जर तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला नक्कीच सिबिल रिपोर्ट किंवा सिबिल ट्रान्सयुनियन ही परिभाषा आढळली असेल. आजकल तुमच्या रोजगार आणि उत्पन्नाखेरीज तुमचा सिबिल रिपोर्ट व स्कोर देखील कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या मान्यतेचा महत्वाचा अंश असतो. तुमच्या सिबिल रिपोर्ट व स्कोरशिवाय क्वचितच कर्ज किंवा क्रेडिट कार्ड यांना मंजूरी मिळते

अशा प्रकारे तुम्ही गुगल पे द्वारे कर्जाची मागणी करू शकता.

• गुगल पे वरून कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला आधी गुगल पे अ‍ॅप तुमच्याकडे असला हवा. 

• यानंतर या अ‍ॅप मधील कर्जाच्या जाहिरातीखाली  पैसे असा  पर्याय  दिसेल तो उघडावा लागेल.  

• यानंतर कर्ज असा पर्याय दिसेल त्यावर बटन दाबून तो उघडावा लागेल. त्यानंतर आपल्याला कोणत्या कारणासाठी  कर्ज घ्यायचे आहे त्याची निवड करावी लागेल. 

• तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्याचा पर्याय येईल ज्यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक, पॅन क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.

• यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि मूलभूत तपशील टाकावा लागेल.

• तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या व्यवसायातून किंवा पगारातून ते निवडावे लागेल आणि तुमचा पॅन तपशील प्रविष्ट करावा लागेल

• जर तुम्ही आधीच कुठूनतरी कर्ज घेतले असेल, तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही, हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून आहे.

• यानंतर तुम्ही किती रुपयांचे कर्ज  घेऊ शकता याचे पर्याय  दिसतील. 

• मग तुमची कर्ज योजना निवडा जसे की किती कर्ज घेतले जाईल आणि किती दिवसासाठी

• आणि त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून कॉल येईल

• त्यानंतर तुमचा डॉक्युमेंट अपलोड करा

• यानंतर तुमचे लोन पास  होईल आणि तुमच्या खात्यात झटपट पैसे फिरविले जातील. म्हणजेच तुम्हाला झटपट कर्ज मंजूर होऊन ती कर्जाची रक्कम  तुम्हाला गुगल पे केली  जाईल. 

गुगल पे कर्जाचे फायदे आता आपण लक्षात घेऊ :-

तुम्हाला कोणत्याही कार्यालयात किंवा कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. 

तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या पसंतीची कंपनी निवडून गुगल पे कर्जासाठी अर्ज करू शकता.

फक्त पॅन नंबर आणि आधार क्रमांकाच्या मदतीने तुम्हाला कर्ज मिळेल.

तुमचा वेळ वाया जाणार नाही, तुम्हाला झटपट मान्यता आणि नकार मिळेल.

तुमचा सिबिल स्कोअर कर्ज मंजुरीसाठी योग्य असावा.

तुमचा सिबिल  अहवाल बरोबर असेल तर तुम्हाला नक्कीच कर्ज मिळेल.

 

डिएमआय  फायनान्सचे या कर्जाच्या बाबतीतले अनुभव विचारात घेतले तर ते म्हणतात की त्यांच्या संपूर्ण संघाने गुगल पेचा वापर करणार्‍या ग्राहकांना पारदर्शक आणि याचा वापर वाढविण्यासाठी  एकत्र आणण्यासाठी काम केले आहे. पुढील वर्षांमध्ये, डिएमआय  फायनान्सचे नवीन भागीदारी वाढवण्याचा आणि लाखो लोकांसाठी आर्थिक संधी/समावेश करण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. ज्याचा फायदा वापर करणार्‍यांना आणि नवीन ग्राहक जोडणी करीता  होईल. मोबाईल फोनवर फक्त एका क्लिकवर हे कर्ज आमच्या वापर करणार्‍यांना  सहज उपलब्ध करून दिले जाईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, गुगल पेचा वापर करणार्‍यांसाठी ही तसेच ही कर्ज सुविधा सहज उपलब्ध करण्यासाठी त्यांना डिएमआय  फायनान्सचे समर्थन नक्की मिळेल, ज्याबद्दल डिएमआय  फायनान्स आणि  गुगल पेचे ग्राहक सुद्धा खूप उत्सुक आहेत . कारण, हे अशा प्रकारचे तंत्रज्ञान  आर्थिक समावेशाचे स्वप्न साकार करू शकणारे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *