ड्रायव्हिंग लायसेंस चे नवे नियम पहा | driving licence new rules 2024 |

ड्रायव्हिंग लायसेंस चे नवे नियम पहा | driving licence new rules 2024 |

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहतूक नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. त्या बदलांनुसार तुमच्या ड्रायविंग लायसेन्स काढण्याच्या नियमांमध्येही काही बदल सुचविलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला ड्रायविंग लायसेन्स काढण्यासाठी आरटीओ मध्ये न जाता, तुम्ही ज्या एजन्सिकडे गाडी शिकत असाल तीच एजन्सी तुम्हाला ड्राइविंग टेस्ट घेऊन लायसन्स देणार आहे. पण ह्या ज्या ड्रायविंग शिकविणार्‍या एजन्सीच आहेत त्या शासनमान्य आणि ज्यांच्याकडे ती अथॉरिटी आहे अशाच एजन्सीज तुम्हाला ड्रायविंग लायसेंसची टेस्ट घेऊ शकणार आहेत. आपण सुजाण भारताचे नागरिक आहोत आपण आपल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आपण आता त्याची सविस्तर माहिती घेऊ:-

 

— मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्याला ड्रायविंग लायसेन्स काढण्यासाठी आरटीओ Regional Transport Office मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. त्यानंतर नियमाप्रमाणे आपल्याला एक ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. ती दिल्यानंतर लर्निंग लायसेन्स मिळते. लर्निंग लायसेन्सची मुदत ही सहा महिन्यांची असते आणि ते संपयाच्या आत आपल्याला परमनंट लायसेन्स काढावे लागते. या अशा पद्धती मध्ये खूप वेळ जातो त्यामुळे अनेकदा गैर व्यवहार होण्याची दाट शक्यता असते. कधी कधी तर काहींना ही क्लिष्ट प्रक्रिया वाटते. याचा दुष्परिणाम भारतातील वाहतूक व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर होतो.
या सर्वांचा विचार करता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहतूक नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करणायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा योग्य परिणाम हा नागरिकाच्या सुरक्षिततेच्या दृटिकोनतून फायदेशीर ठरणार आहे. हे बदल येत्या 1 जून पासून सुरू होत आहेत. ते बदल नेमके काय आहेत याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

आरटीओ चे बदललेले नियम:-

1. सध्या आपण ड्रायविंग लायसेन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अर्ज देऊन ही प्रक्रिया पूर्ण करतो. परंतु 1 जून पासून हे काम खाजगी एजन्सिकडे सोपविण्यात आलेले आहे.
2. १ जून पासून सरकारी मान्यताप्राप्त खाजगी संस्थेकडे तुम्ही ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी परीक्षा देऊ शकता. खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केद्रांना परवाना परीक्षा घेण्यासाठी अधिकृत अनुमति दिलेली आहे.
3. त्यासाठी पुन्हा आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन परीक्षा देण्याची गरज नाही. तुम्ही खाजगी ड्रायव्हिंग प्रसिक्षण केंद्रामध्ये परीक्षा दिल्यानंतर सरकार तुम्हाला वैध प्रमाणपत्र जारी करेल.

 

— मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

4. परवानासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांच्या यादीमध्ये देखील सुधारणा करून तसे नियम बनविण्यात येणार आहेत. परवाना धारकला कोणत्या प्रकारचा परवाना आवश्यक असेल त्या संबंधीची कागदपत्रांची सूची परवानधारकला आधीच देण्याची सूचना या नियमांमध्ये केलेली आहे.
5. असे बदल करण्यात आले असले तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. https://parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइट वर अजून अर्जदार हा आपल्या परवण्यासाठी अर्ज करू शकतात.
6. परवाना शिवाय जर कुणी वाहन चालवीत असेल तर अशा वाहन चालविणार्‍यांसाठी कडक कारवाई होऊ शकते. अशा चालकांना रुपये 2000/- इतका दंड भरावा लागू शकतो.
7. जर अल्पवयीन म्हणजे १८ वर्षा पेक्षा कमी वयोमार्यादा असलेले कुणी गाडी चालवत असेल तर त्याला २५०००/- रुपये इतका दंड आकारला जाईल असे कडक नियम आताच्या बदल केलेल्या नियमांमध्ये केलेली आहे. जर अल्पवयीन चालक पकडला गेल्यास त्याच्या पालकांवर कारवाई होऊन त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द होऊ शकते.
8. विहीत नमुन्यातील वेग मर्यादा ओलांडल्यास रुपये १०००/- ते २००० इतका दंड आकारला जाऊ शकतो.
9. जर हेलमेट न घालता दोन चाकी वाहन चालविल्यास रुपये १००/- इतका दंड आकारला जाईल.
10. कार मध्ये सिटबेल्ट न लावता गाडी चालविल्यास रुपये १००/- इतका दंड आकारला जाईल.
11. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कालबाह्य झालेली सरकारी वाहने निकाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपली वाहने जर अशा प्रकारे जुनी होऊन गेली असतील व त्याचा पर्यावरणाला धोका निर्माण होत असेल तर त्याची योग्य दखल परिवहन कार्यालय लवकरच घेणार आहे.

खाजगी ड्रायविंग स्कूलसाठी सुधारित नियम :-

१. दुचाकी प्रशिक्षण केद्रांसाठी किमान एक एकर जमीन तसेच चारचाकी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान दिन एकर जमीन असणे आवश्यक आहे.
२. प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी चाचणी परीक्षा देणे गरजेचे आहे.
३. प्रशिक्षकाकडे उच्चमाध्यमिक वर्गाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षकाकडे किमान पाच वर्षाचा ड्रायविंगचा अनुभव असणे गरजेचे आहे.

 

— मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

४. प्रशिक्षकाला बायोमेट्रिक आणि आयटी प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे.
५. प्रशिक्षणाचा कालावधी हा हलक्या मोटर वाहनासाठी चार आठवड्यांत २९ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यात आठ तासांचे माहिती आणि २१ तासांचे प्रात्यक्षिक, असे प्रशिक्षण समाविष्ट आहे.
६. जड मोटर वाहनांसाठी सहा आठवड्यांत ३८ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यामध्ये आठ तासांचे माहिती आणि ३१ तासांचे प्रात्यक्षिक, असे प्रशिक्षण समाविष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *