पीक विमा योजना या शेतकऱ्यांना मिळणार खरीप पिक विमा | Maharashtra Crop insurance information in Marathi |

पीक विमा योजना या शेतकऱ्यांना मिळणार खरीप पिक विमा | Maharashtra Crop insurance information in Marathi |

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६ सालापासुन महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. आता मात्र महाराष्ट्र सरकारने यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने पुढील तीन वर्षासाठी “सर्व समावेशक पिक विमा योजना” असा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
“सर्व समावेशक पिक विमा योजना” काय आहे? या योजनेचे पात्रता निकष काय आहेत? यात शेतकर्‍याचा सहभाग कसं असेल? याची माहिती आपण आता घेणार आहोत.
या आधी जी प्रधानमंत्री पिक योजना होती त्यात शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कमेच्या २%, रब्बी हंगामासाठी १.५% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी संरक्षित रक्कमेच्या ५% एवढा हप्ता शेतकर्‍याला भरावा लागत होता. सदर रक्कम प्रती हेक्टरी ७००, १००० २००० पर्यंत जायची.
प्रधानमंत्री पिक योजना ही कर्जदार शेतकर्‍यांसाठी आहे, बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक करण्यात आली आहे. तसेच भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी सुद्धा यात सहभागी होऊ शकतात.

पीक विमा योजनेचे उद्देश :-

पिक विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे शेतकर्‍यांच्या शेतीचे जर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे होय.
१. शेतकर्‍यांच्या पिकांचे जर अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकळी पाऊस, कीटकांचा उपद्रव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पिक विमा यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

२. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात ही शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने केली आहे.
३. आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी राजा आत्महत्या करतो पण त्यापासून बचाव होईल हाच या पीक विमा योजनेचे उद्दीष्ट आहे.

पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये :-

पिक विमा योजनेचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक आहे तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. शेतकर्‍यांव्यतिरिक्त भाडे तत्वावर घेतलेल्या शेतकर्‍यांसाठी म्हणजेच कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हा खरीप हंगामासाठी 2 टक्के ठेवण्यात आला आहे.
पिक लावणीपासून पिक काढणी पर्यन्त जर पिकांचे नुकसान झाले तर त्या नुकसानीस पिक विमा योजना अंतर्गत संरक्षण मिळू शकते.

पिक विमा योजनेचे फायदे :-

१. पिक विमा योजना ही शेतकर्‍याच्या पिकांसाठी संरक्षित कवच आहे.
२. पिकावर रोगराई झाल्यास किंवा हवामानाच्या प्रभावामुळे जर पिकांचे नुकसान होत असेल तर राज्य सरकार कडून या पिक विमा योजने अंतर्गत त्याची नुकसान भरपाई मिळते.
३. या विम्याची नोंदणी अगदी अत्यल्प पैशात होते.
४. प्रतीक शेतकर्‍याने या योजनेचा लाभ घ्यावा.
पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
१. अर्जदाराला किंवा शेतकर्‍याला त्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेत आपले स्वतःचे बॅंक खाते उघडणे अपरिहार्य आहे.

पिक विमा यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

जर त्या अर्जदाराचे खाते या आधीच राष्ट्रीयकृत बँकेत उघडलेले असेल तर त्याला ते खाते या योजनेशी जोडणे आवश्यक आहे. कारण या योजने अंतर्गत मिळणारे अनुदान हे त्या अर्जदारच्या बँकेत हस्तांतरित केले जाणार आहे. त्याबरोबर बँकेचा रद्द केलेला एक चेक सोबत जोडावा.
२. अर्जदार शेतकर्‍याचे बँक खाते हे आधारकार्ड आणि पॅनकार्ड सोबत लिंक असले पाहिजे.
३. जर शेत कसायला घेतले असेल तर व पीक पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी सोबत आणावी लागेल.
४. घरपट्टी, विजेचे बिल
५. रेशनकार्ड
६. पासपोर्ट साइज फोटो

पिक विमा योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?

अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट www.http:pmfby.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल आणि आपल्या सगळ्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी. पीक विमा योजनेच्या संदर्भात जर शेतकरी अर्जदारला काही अडचण किंवा समस्या असल्यास तालुका संबंधित पिक विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जवळची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राला संपर्क करावा.

 

 

पिक विमा यादी चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *