पर्सनल कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर किती असला पाहिजे | Personal Loan CIBIL Score Information |
कर्ज मंजूर होण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? सिबिल स्कोअर कसा मोजला जातो?
मंडळी, कर्ज हवंय पण मिळत नाही? तुम्ही अनेक वेळा अनुभवलं सुद्धा असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही बँकेत कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमच्या बँकेकडून सिबिल स्कोअरविषयी चर्चा होते. तुम्ही व्यक्ती असा किंवा कंपनी तुम्हाला बँकेकडून कर्ज मंजूर होईल किंवा कर्ज नाकारला जाईल हे त्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या सिबिल स्कोर वरून ठरतं.
म्हणूनच सिबिल स्कोर काय असतो? कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर किती असावा? लोन घेत असाल तर समजून घेणं महत्त्वाचं आहे.
म्हणूनच कशा प्रकारे सिबिल स्कोअर मोजला जातो? तुमच्यासाठी त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😍 हे पण वाचा
📷 फोटो मध्ये गाणे बसून एक मिनिटांमध्ये व्हाट्सअप स्टेटस तयार करा
👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सिबिल CIBIL स्कोअर व्यवस्थापित करणारी संस्था, एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीचे कर्ज आणि क्रेडिट कार्डशी संबंधित पेमेंट्सचे रेकॉर्ड गोळा करते आणि देखरेख करते.
म्हणूनच तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की तुम्ही बँक किंवा इतर कोणत्याही संस्थांमध्ये कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँक तुमच्याशी सिबिल स्कोअरची चर्चा करते. खरं तर, तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे सिबिल स्कोअरवर अवलंबून आहे.
बरेच लोक सामान्य जीवनात त्यांच्या आर्थिक व्यवहारात अत्यंत निष्काळजी असतात, परिणामी त्यांना त्यांच्या सिबिल स्कोअरच्या स्थितीबद्दल माहिती नसते आणि त्यांचं लोन ॲप्लीकेशन नाकारलं जातं. हा सिबिल स्कोर काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे सविस्तर समजून घेऊया.
सिबिल स्कोअर काय असतो?
तुमचं कर्ज मंजूर करायचं किंवा नाही. तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता आहे किंवा नाही हे सगळं ठरवणारी एक संस्था असते. सिबिल स्कोअर व्यवस्थापित करणारी संस्था व्यक्ती आणि गैर-व्यक्ती (व्यावसायिक संस्था) यांच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड्सशी संबंधित पेमेंट्सचे रेकॉर्ड गोळा करते आणि देखरेख करते. बँक आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांच्या वतीने या नोंदी दर महिन्याला संस्थेला पाठवल्या जातात. ह्या माहितीच्या मदतीने क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (CIR) आणि क्रेडिट स्कोर ठरवला जातो.
तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँका तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासतात. त्यावेळी तुमचा स्कोअर कमी असेल तर तुमच्या कर्जासाठीच्या अर्जाचा विचार न करता बँक तुम्हाला त्याच वेळी कर्ज देण्यास नकार देऊ शकते.
थांबा! पण जर तुमचा सिबिल स्कोअर उच्च असल्यास, बँक कर्ज प्रक्रियेसह पुढे जाते आणि तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्ज मंजूर करते. बऱ्याच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सिबिल स्कोर जितका जास्त असेल तितकी कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. कर्ज मंजूर करण्याचा अंतिम निर्णय फक्त बँक किंवा इतर पतसंस्था घेतात.
मग कर्ज मंजूर व्हायला योग्य सिबिल स्कोअर किती असावा?
सिबिल स्कोअर 300 आणि 900 गुणांच्या दरम्यान मोजला जातो. यामध्ये तुमचा गुण किमान 750 पेक्षा जास्त असावा. यापेक्षा कमी असेल तुम्ही अडचणीत येऊ शकता. 800 च्या वर स्कोअर चांगला मानला जातो. तसही ज्या लोकांचा स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना लवकर आणि सहज कर्ज मिळू शकतं. कोणत्याही व्यक्तीचा सिबिल स्कोअर दर महिन्याला बदलतो बरं का!
कर्ज मिळविण्यासाठी CIBIL स्कोर महत्त्वाचा का आहे?
पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. याचा अर्थ असा की जेव्हा बँक किंवा इतर कोणतीही कर्ज देणारी संस्था तुम्हाला पर्सनल लोन देते, तेव्हा तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची किंवा सुरक्षा ठेव करण्याची आवश्यकता नसते. बँका/कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी ही एक धोकादायक गुंतवणूक आहे. यामुळेच बँका/एकाकी संस्था पर्सनल लोन साठी आलेल्या अर्जांचे मूल्यांकन करताना अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर, विशेषत: CIBIL स्कोरकडे अधिक लक्ष देतात.
तुमचा सिबल स्कोअर बँक किंवा कर्ज संस्थेला खालील प्रकारे मदत करतो
क्रेडिट स्कोअर दर्शवते की कर्ज देताना व्यक्ती किती जोखीम घेते
कर्जाचा व्याजदर ठरवण्यात भूमिका बजावते
कर्जाची रक्कम ठरवण्यात मदत करते.म्हणजे तुम्ही किती कर्ज घेऊ शकता ते ठरतं.
कमी सिबिल स्कोअरचा अर्थ असा नाही की तुमचा पर्सनल लोनसाठी केलेला अर्ज नाकारला जाईल. असंही होऊ शकतं की यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज जास्त व्याजदराने मिळण्यास मदत होईल किंवा तुम्ही अर्ज केलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा कमी रकमेसाठी कर्जाची रक्कम मंजूर केली जाऊ शकते.
कर्जासाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात
तुमचा CIBIL स्कोर आणि CIBIL रिपोर्ट तपासा. तुम्हाला CIBIL अहवालात चुकीची माहिती आढळल्यास,
दुरुस्तीसाठी CIBIL विवाद दाखल करा.
तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो खूप जास्त असल्यास, तुमची थकबाकी पूर्ण करा. असं करणार नसाल तर बँक किंवा कर्ज संस्था तुम्हाला क्रेडिटवर खूप अवलंबून असलेली व्यक्ती म्हणून बघते.
तुमचा कर्ज अर्ज फेटाळला गेला असेल, तर कर्जासाठी लवकर अर्ज करू नका. प्रथम, तुमचा अर्ज का मंजूर झाला नाही याची कारणे शोधा आणि नंतर ती दुरुस्त करा.
नाकारलेल्या वैयक्तिक कर्जाच्या अर्जासाठी, पुन्हा अर्ज करण्यापूर्वी काही महिने प्रतीक्षा करा.
कमी CIBIL स्कोअरसह पर्सनल लोन कसं मिळवायचं?
होय, असं होऊ शकतं! अनेक बँका आणि कर्ज संस्था आहेत ज्या अर्जदाराला CIBIL स्कोर कमी असला तरीही वैयक्तिक कर्ज देतात. पण अशा प्रकरणांमध्ये व्याजदर जास्त असू शकतो आणि कर्जाची रक्कम कमी असू शकते.
लोन मंजूर करायचंय तर क्रेडिट कार्ड वापरा
क्रेडिट स्कोअर हे कोणत्याही प्रकारच्या कर्ज, विमा इत्यादीसाठी पात्रता जाणून घेणारे पहिले पॅरामीटर बनलं आहे आणि आपला क्रेडिट स्कोअर तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे.
Experian, Equifax आणि CIBIL सारखे क्रेडिट ब्युरो त्यांच्या संबंधित सूत्रांचा वापर करून व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर मोजतात.
उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्ती अधिक आर्थिकदृष्ट्या जबाबदार मानल्या जातात आणि त्यांचे कर्ज/क्रेडिट कार्ड अर्ज मंजूर होण्याची अधिक शक्यता असते. तर, क्रेडिट कार्ड क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम करतो आणि क्रेडिट स्कोअर क्रेडिट कार्डसाठीच्या पात्रतेवर कसा परिणाम करू शकतो आणि क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी तुमचा CIBIL स्कोर काय असावा ते समजून घ्या.
तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असूनही तुम्हाला क्रेडिट कार्ड का मिळत नाही ?
काही वेळा तुमचा सिबिल स्कोअर चांगला असला तरीही तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्याची कारणे अशी असू शकतात.
तुम्ही आधीच अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बिलं भरत आहात.
तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो जास्त आहे.
कमी क्रेडिट हिस्ट्री
अलीकडे कोणताही ईएमआय भरला नाही किंवा उशीर झाला.
कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांसाठी क्रेडिट कार्ड
तुमचा क्रेडिट स्कोअर नसेल किंवा काही कारणास्तव तुमचा क्रेडिट स्कोअर घसरला असेल तर तुम्ही सुरक्षित क्रेडिट कार्ड मिळवू शकता. तुम्ही तुमच्या मुदत ठेव बँकेकडे तारण ठेवून सुरक्षित क्रेडिट कार्ड घेऊ शकता. तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास, तुमच्या FD मधून पैसे कापण्याचा अधिकार बँकेकडे आहे. याचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या FD वर व्याज मिळत राहते आणि त्याच बरोबर तुम्ही क्रेडिट कार्ड देखील वापरता.
भारतातील काही सर्वोत्तम सुरक्षित क्रेडिट कार्डस्
ॲक्सिस बँक इन्स्टा इझी क्रेडिट कार्ड
ICICI बँक कोरल क्रेडिट कार्ड
SBI कार्ड उन्नती
ICICI बँक इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर कसा सुधारू शकता
तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर सुधारू शकत नाही असं नाही. कर्ज मंजूर करून घेण्यासाठी तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सुधारू शकता. हे तुमच्याच हातात आहे. यासाठी तुम्हाला आर्थिक व्यवहारात शिस्त आणावी लागेल. तुम्हाला चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार करावी लागेल.
काही विशेष प्रयत्नांनी यात सुधारणा करता येऊ शकते. सर्व प्रथम, प्रत्येक महिन्याला वेळेवर थकबाकी भरा.
यामध्ये गृहकर्जाचा हप्ता, वाहन कर्जाचा हप्ता, वैयक्तिक कर्जाचा हप्ता आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत.
मित्रांनो, तुम्ही सहा ते आठ महिने सतत वेळेवर पेमेंट करत राहिल्यास तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास सुरुवात होईल. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, त्याची मर्यादा वाढवू नका, कारण असं केल्याने नकारात्मक परिणाम होईल. जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल तर ते पूर्ण करा. कर्जाची पुर्तता करू नका. हे सिबिल स्कोअरचे नुकसान करते. तसेच, वेळोवेळी तुमच्या क्रेडिट अहवालाचे पुनरावलोकन करा.