आता ऊसाची नोंद ऑनलाईन करून चिंतामुक्त व्हा. महा ऊस नोंदणी ॲप्लिकेशन विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घ्या.Us Nandani app information

आता ऊसाची नोंद ऑनलाईन करून चिंतामुक्त व्हा. महा ऊस नोंदणी ॲप्लिकेशन विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती घ्या.Us Nandani app information

नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक गोड बातमी आहे जी तुमची बरीचशी चिंता कमी करणारी आहे. तुमच्या मोबाईल वर, कुठेही न जाता राज्यातील १०० सहकारी व १०० खासगी असे एकूण २०० कारखान्यांकडे ऊस नोंदणी होऊ शकते. आहे की नाही गोड बातमी!

शेतकऱ्याचा ऊस शेतात पडून राहू नये ह्यासाठी सरकारने एक घरबसल्या नोंदणी करण्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आणलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची नोंद कारखान्याला करण्याची गरज असते तेव्हा कुठे ऊस कारखान्याला जातो, परंतु असे बऱ्याचदा शेतकरी वाट पाहत राहतो अन होतं काय की, कारखान्याकडून ऊसतोड येतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात नाही, आणि मग अनेक शेतकरी निराश होतात. म्हणूनच शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सरकारने एक ऑनलाईन ॲप्लिकेशन आणलं आहे. ह्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतातील ऊसाची नोंद साखर कारखान्याला न भेट देता थेट तुमच्या मोबाईलवर अगदी घरबसल्या करू शकता. या मोबाईल अप्लिकेशन चं नाव महा-ऊस नोंदणी असं आहे. हे मोबाईल ॲप्लिकेशन साध्या मराठी भाषेत आहे. त्यामुळे ते कुठल्याही शेतकरी मित्राला वापरता येईल. आणि महत्वाचं म्हणजे ऊस नोंदणी केलेल्या साखर कारखान्याला शेतकऱ्याचा ऊस घेऊन जावंच लागेल अशी सक्ती शासनाने केली आहे.

महा-ऊस नोंदणी ॲप्लिकेशन आहे तरी काय?

महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी ऊस पिक नोंदणीसाठी महा ऊस नोंदणी ॲप तयार करण्यात आलं आहे. हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही असे शेतकरी या मोबाईलवरच स्वतःच्या शेतातील ऊस पिकाची नोंद करू शकतात. आणि तुम्ही शेतकरी आहात आणि जर तुम्ही एखाद्या साखर कारखान्यात ऊस नोंद केली आहे, त्यांच्या नोंदणीची माहिती ह्या ॲप्लिकेशन मध्ये दिसेल. शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी करूनही ऊस तोडणीसाठी कारखानदार येत नसल्याने हे ॲप्लिकेशन बनवण्यात आलं आहे. ज्याने शेतकरी सुखावेल आणि त्याच्या बऱ्याच अडचणी कमी होतील अशी आशा आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हे पण वाचा

👳🏻‍♂️ शेतकऱ्यांना मिळणार मोफत तीन लाख रुपये कर्ज बिन व्याजी.

👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सध्या राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे म्हणूनच ह्या ॲपमुळे ऊस नोंदणी करताना होणारा शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, असं सहकारमंत्री सावे ह्यांनी ॲप लाँच करताना बोलले होते. ऊस हे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारे नगदी पीक आहे. पण ग्रामीण भागात ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात आणि ऊसाची तोड कधी होईल ह्याबाबत शेतकरी चिंतेत असतात. आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर बीड येथील एका शेतकऱ्याने चक्क ऊस तोड होत नाही. आता काय करायचं? ह्या विवंचनेतून उसाच्या फडात स्वतःसह आग लावून आत्मह्त्या केली.
पण आता ह्या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून ऊसाची नोंद होणार असल्याने ऊस वेळेवर तुटेल आणि शेतकऱ्यांची मेहनत फळाला येईल. यामध्ये एका कारखान्याव्यतिरिक्त अजून दोन कारखान्यांचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यामुळे ऊस तोडणीविषयी खात्री मिळेल, असा विश्वास आहे.

महा-ऊस नोंदणी’ॲप कसा वापरायचा?

शेतकरी मित्रांनो, ‘महा-ऊस नोंदणी’ॲप वापरायला खूप सोपा आहे. तो गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हा ॲप डाऊनलोड करुन त्यावरुन आपल्या चालू हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती भरावी लागेल. हे मोबाईल ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून सहजरीत्या डाउनलोड करू शकता. तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअर वर जाऊन महा उस नोंदणी असे सर्च करायचे आहे. सर्च रिझल्ट मध्ये महा उस नोंदणी हे ॲप्लिकेशन येते. हे डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावे. महा ऊस नोंदणी ॲप मोबाईल मध्ये घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतातील उसाची नोंद साखर कारखान्याला करू शकता

ॲपमध्ये ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊस क्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला ह्या ऊस नोंदणीसाठी निवडायचं ह्यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येईल, ह्या ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील १०० सहकारी व १०० खासगी असे एकूण २०० कारखान्यांकडे ऊस नोंदणीची माहिती पाठवेल. आहे की नाही हे सगळं सोपं!

 

महा उस नोंदणी ॲप्लिकेशन वर ऊस पीक नोंदणी अशी करा.

१. सर्वात आधी महा उस नोंदणी ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.

२. ॲप उघडून तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर तुमचं पूर्ण नाव ही आवश्यक माहिती भरायची आहे.

३. पुढे जाऊन तुम्हाला तुमचा ऊस पीक असलेला जिल्हा, तालुका, गाव, गट किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे.

४. त्यानंतर ऊसाचा हंगाम निवडायचा आहे. त्यानंतर उसाची व्हारायटी किंवा जात निवडायची आहे.

५. लागवड दिनांक, ऊस लागवडीखालील क्षेत्र गुंठ्या मध्ये भरायचं आहे.

६. त्यानंतर आपण ऊस तोड करण्यासाठी तीन साखर कारखान्यांची नावं तुम्हाला निवडायची आहेत.

७. जर ही सर्व माहिती तुम्ही अचूक भरली असेल तर तुम्ही ऊस क्षेत्राची माहिती नोंदवा हे बटन दिसेल. त्यावर क्लीक करा.

तर शेतकरी मित्रांनो ही सविस्तर माहिती होती ह्या ॲप्लिकेशन संदर्भात. तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी नसाल तर आपल्या ऊस उत्पादक शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *